आलापल्ली येथील मडावी कुटुंबाचे नवस कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती

अहेरी : काँग्रेसचे नेते व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांचे चिरंजीव स्वप्नील मडावी यांची मुलगीचा नवस कार्यक्रम आज त्यांच्या राहते घरी आलापल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाची निमंत्रण मडावी कुटुंबीयांनी दिल्याने त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत उपस्थिती दर्शवून भेट वस्तू देऊन चिमुकल्याना शुभआशीर्वाद दिले.
यावेळी आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,सरपंच अजय आत्राम,सरपंच लक्ष्मण गावडे,सचिन पंचार्य,प्रमोद गोडसेलवार,गणेश रच्चवारसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मडावी परिवारातील सदस्य उपस्थित होते.