काँग्रेसनेते अजय कंकडालवार व हनमंतु मडावी यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

अहेरी : तालुक्यातील किष्ठापूर ( वेल ) पोलीस पाटील महेश अर्का यांचे जेष्ठ चिरंजीव वर – सोनू यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील आक्सपूर येथील लक्ष्मण येरमे यांचे जेष्ठ कन्या वधू – स्वाती यांच्या विवाह वराचा मंडपात किष्ठापूर ( वेल )येथे विवाह सोहळा संपन्न झाला.या विवाह सोहळ्याला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवर,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,नरेंद्र गर्गम,प्रमोद गोडसेलवार आविस,काँग्रेस पार्टीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.