काँग्रेस नेते अजय कंकडालवार व हनमंतु मडावी यांच्या हस्ते भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन

अहेरी : तालुक्यातील गुर्जा( बु ) येथील जय गोंडवाना गुर्जा( बु ) यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केले आहे.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून तसेच तृतीय पारितोषिक मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलदी,पेरमिली ग्रामपंचायतचे सदस्य प्रमोद आत्राम कडून देण्यात येत आहे.
सदर व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,मेडपली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलादी,पेरमेली ग्राम पंचायतचे माजी सरपंच विद्यमान सदस्य प्रमोद आत्राम,पो.पा.बीचु गावडे,भामरागड आवीस तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा,पत्रकार आशिफ पठाण, नरेंद्र गर्गम, रमेश सावकार पुपरेडीवार, पटाडी पल्लो,प्र.ना.टागरू कोवासे,प्र.ना.तुषार मडावी,रमेश गावडे, सतीश गावडे,कटिया तलंडी.रामजी नरोटी, नानू गावडे, सन्ना गावडे, साधू गावडे,मादी नारोटी,रोशन जाकेवार,सुरज मडावी,अक्षय सडमेक,अशोक मेश्राम,सचिन पांचर्या,सूर्यप्रकाश पेंदाम, प्रमोद गोडशेलवारसह आदी उपस्थित होते.



