माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले जन्ममहोत्सव कार्यक्रमाचे उदघाटन

मूलचेरा : तालुक्यातील सुंदरनगर येथे श्रीश्री ठाकूर अनुकूल चंद्रजी व परमपूज्यपाद श्री.श्री दादा यांच्या जन्ममहोत्सव व स्मरनोत्सव कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस समन्वयक अहेरी विधानसभा क्षेत्र व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून पूजन करत आशीर्वाद घेतले.
मुलचेरा तालुक्यात बंगाली बांधवांची संख्या मोठी असून येथील अनेक गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुंदरनगर येथील सत्संग विहार तेथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता.आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडले.तसेच मंदिरास विधिवत पूजन करत आशीर्वाद घेतले.
यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.