Uncategorized

बामनपल्ली येथील शेतकरी बूचय्या नीलम यांना चंद्रपूर खाजगी दवाखान्यात रेफर

भामरागड : तालुक्यातील मन्नेराजाराम अंतर्गत येत असलेल्या बामनपल्ली येथील रहिवाशी बुचय्या समय्या नीलम ( वय 40 वर्षी ) यांनी शेतीचे काम करून कुटुंबा उदरनिर्वाह चालवत होती.अचानक बुचय्याला पोटात दुखणे उतरल्याने त्यांना आलापल्ली येथील खाजगी सेवासदन  हॉस्पिटल ला भर्ती केले.मात्र डाक्टरांनी त्यांना चंद्रपूर येथे खाजगी दवाखान्यात भर्ती करण्यात यावी म्हणून त्यांचे नातेवाईकांना सांगितले होते.

             नीलम परिवार अंत्यत गरीब असून चंद्रपूर दवाखान्यात भर्ती होण्यासाठी नीलम कुटुंबाला आर्थिक अडचण भासत होती.या आर्थिक मदतीची विषय आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना माहिती देतच बुचय्या नीलम यांची चंद्रपूर जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करून दिले.तसेच दवाखान्यात औषध उपचारासाठी आर्थिक मदतही केली.त्यावेळी नीलम कुटुंबातील सदस्यांनी अजय कंकडालवारांची आभार मानले.

            यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,लक्ष्मण आत्राम,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गेसह आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close