Uncategorized

अहेरी तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था; काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हा परिषद CEO ना दिले निवेदन

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील गोलाकर्जी-रायगट्टा-राजाराम-छल्लेवाडा-कोळसेलगुडम-कमलापूर-रेपनपल्ली या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून याबाबत वेळोवेळी सूचना व पत्रव्यवहार करून देखील जिल्हा परिषद प्रशासन व संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे.

सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्याची चाळण झाली असून नागरिकांना ये-जा करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागत आहे.

या गंभीर विषयावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली यांना निवेदन देऊन रस्त्याचे तात्काळ बांधकाम व दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

तात्पुरती डागडुजीसोबतच नवीन रस्ता मंजूर करण्याचीही मागणी

सध्या पावसाळ्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत आणि या संपूर्ण रस्त्यासाठी नवीन रस्ता मंजूर करण्यात यावा,अशीही मागणी अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.

प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम देत त्यांनी इशारा दिला आहे की,जर ७ दिवसाच्या आत रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत,तर दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता छल्लेवाडा-कमलापूर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये धान रोवणी व रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.

दरम्यान,या निवेदनाची दखल घेऊन प्रशासन खड्डे बुजवणार का, की नेहमीप्रमाणे आंदोलनानंतरच प्रशासनाला जाग येणार, असा सवाल सामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close