राजकीय

आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे युवा नेते,माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी उपोषण मंडपाला भेट

आविसं व अजयभाऊ मित्र परिवार कडून उपोषणाला जाहिर पाठिंबा दिले

विदर्भ टाइम्स न्युज नेटवर्क / अहेरी शहर प्रतिनिधी ( Aheri )

भामरागड तालुक्यातील येचली अवैध रेतीसाठा प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईसह या प्रकाराला मूक संमती देणा-या अधिकारी,कर्मचा-याना निलंबित करण्याच्या मागणीला घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी आमरण उपोषण पुकारले आहे.दरम्यान उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी उपोषण स्थळी भेट दिली.सदर प्रकरणात संबंधितांवर कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.भामरागड तालुक्यातील येचली नदी घाटातील रेतीची उचल न करताच बनावट दस्ताऐवजाच्या आधारे येथील रेतीचा नवनिर्माणाधिकन कामात वापर करणे,अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करुन शासनाला कोट्यावधी रुपयाचा चूना लावल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते ताटीकोंडावार यांनी वेळोवळी तक्रार,निवेदन सादर करीत या प्रकरणातील दोषी कंत्राटदार तसेच संबंधित अधिकारी,कर्मचा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.मात्र वरिष्ठ स्तरावरुन कोणतीही कारवाई न झाल्याने सबंधित दोषी अधिकारी,कर्मचारी व कंत्राटदारावर फौजदारी तसेच दंडात्मक कारवाईच्या मागण्यांना घेऊन त्यांनी 14 जूनपासून अहेरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले आहे.तीव्र उकाड्यात सदर आंदोलन आज,शुक्रवारी तिस-या दिवसीही सुरु आहे. दरम्यान कंकडालवार यांनी उपोषण स्थळाला भेट देत उपोषणकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची आस्थेने विचारपूस केली.तसेच सदर प्रकरणी आपण स्वत:हून लक्ष घालणार असून प्रशासनातील वरिष्ठांशी चर्चा करुन कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.असुन आविस व अजयभाऊ मित्र परिवाराकडून जाहीर पाठिंबा आहे अशी जाहिर केले.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,नरेंद्र गर्गम,राजु मामिळवार,विजय रामेरकर,राकेश सडमेक सह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close