Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची भगतनगर येथे गणेश मंडळाला भेट

मुलचेरा : तालुक्यातील भगतनगर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गणेश मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.एटापल्ली येथील आढावा बैठक ओटपून काल काँग्रेस अहेरी विधानसभा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची भगतनगर येथील विध्वेश्वराय गणेश मंडळाला भेट दिले.

भेट दरम्यान अजयभाऊ कंकडालवार व हणमंतू मडावी साहेब यांनी श्रीगणरायाची विधिवात पूजा अर्चना करून श्रीगणरायाची दर्शन घेतले आहे.तसेच समस्त जनता नेहमी आनंदी,निरोगी सुखीजीवन लाभावे म्हणून त्यांनी श्रीगणपती बाप्पा चरणी प्रार्थना केले.दरम्यान गणेश मंडळा कडून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची सत्कारही करण्यात आली.विशेष म्हणजे श्रीबाप्पाचे मूर्तीसाठी अजयभाऊ कंकडालवार यांचा कडून वर्गणी देण्यात आली तसेच मंडळा जवळ अन्नदान कार्यक्रम साठी हणमंतू मडावी साहेब यांचा कडून देण्यात आली.

यावेळी परिसरातील नागरिक व भाविक तसेच काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close