Uncategorized

काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांच्या कडून अडचणीत असलेल्या रामटेके परिवाराला आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील महागाव बु येथील रहिवासी ज्ञानेश्वर रामटेके यांची मुलगी अनुष्का रामटेके हिला काही दिवसांपासून त्याबेत ठिक नसल्यामुळे हिला उपचारासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालय येते भर्ती करण्यात आली.मात्र रुग्ण अनुष्का रामटेके हिला अहेरी येथून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रेफर करण्यात आली होती.

रामटेके परिवार अंत्यत गरीब असून त्यांना बाहेरच औषध आणि इतर खर्चासाठी रामटेके परिवाराला अडचण भासत होती.आज वडील ज्ञानेश्वर रामटेके यांनी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालय येते कंकडालवार यांच्या भेट घेऊन त्यांची अडचण बाबत सांगितले होते.त्यांची अडचण बघून त्यांना पुढील खर्चासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,ज्ञानेश्वर रामटेके,राजू दुर्गे,लिंगा दहागा वकर,सत्यन्ना वसेकरसह आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close