Uncategorized

काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेची उदघाटन

अहेरी : तालुक्यातील बोटलाचेरू येथील नवयुवक क्रिकेट क्लब द्वारे टेनिस बाॅल ३० यार्ड क्रिकेट स्पर्धेचे आयोजित केली आहे.सदर क्रिकेट स्पर्धेची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

या क्रिकेट स्पर्धेसाठी आविसं काँग्रेसचे नेते व अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीया पारितोषिक लाईस्ट मेटल सुरजागाड कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक नवयुवक क्रिकेट क्लब कडून देण्यात येत आहे.

या कार्यक्रमाची सह उदघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष बोटलाचेरू माजी पोलीस पाटील सीताराम मेश्राम होते.

यावेळी उदघाटन प्रसंगी अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीता चालूरकर,अशोकभाऊ येलमुले माजी सरपंच,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्या,स्वप्नील भाऊ मडावी,प्रशांत गोडसेलवार,पूनेश कदीकुनिवर,अनिल आत्राम,अक्षयभाऊसह आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close