Uncategorized

जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपचाराकरिता केली आर्थिक मदत

अहेरी : दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूर करून पुढील उपचाराकरिता आर्थिक मदत केली.

अहेरी तालुक्यातील जीमेला येथील रहिवाशी विलास आत्राम यांची काही दिवसापूर्वी हाताची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.दरम्यान हाताला ड्रेसिंग करण्या करीता स्वगाव असलेला जीमेला रोहित सडमेक व विलास आत्राम हेमलकसा येथे दुचाकीने परत येत असताना.दुचाकीचे नियंत्रण बिघडल्याने खाली कोसळले.

यावेळी त्यांच्या डोक्याला व तोंडाला जबर मार लागल्याने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांकडून जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहिती होताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत प्रकृतीची विचारपूस करून पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,दीपक संगमवारसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close