आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जाणून घेतले मुक्कीडगुट्टा येथील नागरिकांचे समस्या

सिरोंचा : तालुक्यातील मुक्कीडगुट्टा येथील जेष्ठ नागरिक व युवकांनी काल आदिवासी विध्यार्थी संघा – काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांचे अहेरी जनसंपर्क कार्यालय येते भेट देऊन अनेक विविध विषयांवार चर्चा करण्यात आली आहे.चर्चा दरम्यान गावातील नाली,रस्ते,आरोग्य सुविधा,शिक्षण,वीज पुरवठा समस्यासह युवकांचे समस्या बाबत पण चर्चा करण्यात आली आहे.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,नरेश गर्गम,लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक,महेश तलांडे,किरण कोंडागुर्ला,प्रकाश दुर्गेसह गावातील युवक – जेष्ठ नागरिक तसेच आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.