BREAKING NEWS : सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या खाली चिरडून दुचाकीस्वार शिक्षक ठार

विदर्भ टाइम्स न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )
आलापल्ली : लोहखनीज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या खाली चिरडून दुचाकी स्वार शिक्षक ठार झाल्याची घटना आज शनिवार दुपारी तीन वाजताच्या दरम्यान आलापल्ली पोलीस चौकी समोर घडली.ठार झालेल्या शिक्षकाचे नाव वासुदेव कुलमेथे असे असून देवलमरी येथील भगवंतराव शाळेत कार्यरत होते अशी माहिती आहे.आज दुपारच्या सुमारास फुललेले हे आपल्या दुचाकीने नागेपल्लीकडे जात असताना मागून येणाऱ्या अवजड माल वाहून नेणाऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने चाका खाली येऊन चिरडले गेल्याने घटनास्थळी ठार झाले. या अपघातानंतर आलापली पोलीस चौकी समोर संतप्त लोकांनी या घटनेविषयी रोश व्यक्त केला आहे. सुरजागड लोह प्रकल्प आणखी किती निष्पाप लोकांचा बळी घेणार असा सूर जनतेत उमटलेला आहे.अपघातानंतर तणावाची परिस्थिती असून पोलीस लगेच घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करीत आहेत.