Uncategorized

मच्छीगट्टा येथे क्रीडा उत्सव! राणी दुर्गावती क्रीडा मंडळातर्फे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धा, अजय कंकडालवार यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन

मुलचेरा : तालुक्यातील मच्छीगट्टा या गावात सध्या क्रीडा उत्सवाचे वातावरण आहे.येथील राणी दुर्गावती क्रीडा मंडळ,मच्छीगट्टा यांनी ग्रामीण युवकांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धेमुळे संपूर्ण मुलचेरा तालुक्यासह आसपासच्या गावातील क्रीडाप्रेमी युवकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

या भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव,गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अर्जुनी-मोरगाव विधानसभा प्रभारी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी त्यांचे गावात आगमन होताच राणी दुर्गावती क्रीडा मंडळाच्या युवकांनी आणि ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.

दरम्यान अजय कंकडालवार उद्घाटन प्रसंगी युवकांना मार्गदर्शन करताना “ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा क्षेत्रात प्रचंड गुणवत्ता आहे.त्यांना फक्त योग्य व्यासपीठाची गरज आहे.राणी दुर्गावती क्रीडा मंडळाने असे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.अशा स्पर्धांमुळे युवक व्यसनापासून दूर राहतील आणि आपले आरोग्य सुदृढ ठेवून क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करतील.माझी साथ आणि सहकार्य नेहमीच अशा युवकांच्या पाठीशी राहील.त्यांच्या या प्रेरणादायी भाषणाने उपस्थित युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

या स्पर्धेत विजेत्या संघांसाठी मान्यवरांच्या वतीने आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत,माजी जि.प.अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे.द्वितीय पारितोषिक मच्छीगट्टाचे ग्रामविकास अधिकारी मा.श्री.पी.गेडाम साहेब यांच्याकडून तृतीय पारितोषिक तंटामुक्ती अध्यक्ष वेंकटेश धानोरकर,लिंगाजी टेकूलवार, विकास सेडमाके, सुरेश आत्राम यांच्याकडून संयुक्तरित्या देण्यात येत आहे.

 

या स्पर्धेत मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांतील नामांकित व्हॉलीबॉल संघांनी सहभाग घेतला असून,प्रेक्षकांना चुरशीचे आणि थरारक सामने पाहायला मिळत आहेत.या उद्घाटन सोहळ्याला राणी दुर्गावती क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी,मच्छीगट्टा ग्रामपंचायतचे सरपंच,सदस्य,काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक,क्रीडाप्रेमी आणि शेकडो युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल राणी दुर्गावती क्रीडा मंडळ, मच्छीगट्टा यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close