Uncategorized

ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेत्यांचा सन्मान,अजय कंकडालवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण

एटापल्ली : तालुक्यातील येमली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मंगुठा येथे ग्रामीण भागातील लपलेल्या क्रीडा प्रतिभेला वाव मिळावा आणि युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता क्रीडा क्षेत्रात आपले भविष्य घडवावे,या उदात्त हेतूने जय गोंडगोवारी जय जोहार क्रीडा मंडळ,मंगुठा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचा काल थाटात समारोप झाला.

या स्पर्धेचे उद्घाटन अहेरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ. सोनालीताई कंकडालवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले होते.

स्पर्धेच्या अंतिम दिवशी काल विजेत्या संघांना बक्षीस वितरण सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव,गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अर्जुनी-मोरगाव विधानसभा प्रभारी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी बोलताना अजयभाऊ कंकडालवार म्हणाले,ग्रामीण भागात प्रचंड क्रीडा प्रतिभा आहे,गरज आहे ती फक्त व्यासपीठाची अशा स्पर्धांमुळे युवक एकत्र येतात,त्यांच्यात सांघिक भावना वाढते आणि ते व्यसनापासून दूर राहतात.जय जोहार क्रीडा मंडळाने अतिशय चांगले आयोजन केले आहे.भविष्यातही अशाच स्पर्धांना आमचे सहकार्य राहील.

या स्पर्धेत परिसरातील अनेक संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघाचे सर्वत्र कौतुक होत असून,मंगुठा गावात एकच क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.या कार्यक्रमाला परिसरातील खेळाडू,क्रीडाप्रेमी,युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close