Uncategorized

खेळातूनच एकता आणि खेडाळुंना ऊर्जा प्राप्त होतात….काँग्रेस नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन

भामरागड : तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या मिरगुळवंचा गावात सध्या क्रीडा उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे.ग्रामीण भागातील लपलेल्या क्रीडा प्रतिभेला मोठं व्यासपीठ मिळावे,युवकांनी व्यसनापासून दूर राहून आपले भविष्य क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात घडवावे,या उदात्त हेतूने येथील जय धर्मकोला ताडो क्रीडा मंडळ यांच्या वतीने ग्रामीण कबड्डी आणि व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव,गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अर्जुनी-मोरगाव विधानसभा प्रभारी,डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते फीत कापून अत्यंत उत्साही आणि जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आले.

या कबड्डी आणि व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी लागणारे आकर्षक पारितोषिके अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून देण्यात येत आहे.त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी उपस्थित खेळाडू,तरुण-तरुणी आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना काँग्रेस नेते कंकडालवार म्हणाले,खेळांमुळे तरुणांमध्ये ऊर्जा,एकता,शिस्त आणि सामूहिकतेची भावना निर्माण होते.आजचा युवक उद्याचा भारताचं भविष्य आहे.त्यामुळे शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रही तितकेच महत्त्वाचे आहे.भामरागड सारख्या दुर्गम भागातील मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे,गरज आहे ती त्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शनाची.व्यसनापासून दूर राहून युवकांनी मैदान गाजवावे आणि आपल्या गावाचे,तालुक्याचे नाव लौकिक करावे.

उद्घाटन सोहळ्यानंतर अजयभाऊ कंकडालवार यांनी गावातील नागरिक,वृद्ध,महिला आणि युवकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी,रस्ते,पाणी,शिक्षण आणि रोजगाराच्या समस्या जाणून घेतल्या.या समस्या सोडविण्यासाठी आपण कसोसीने प्रयत्न करू,असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिली.

काँग्रेस नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह मिरगुळवंचा गावात दाखल होताच येथील स्थानिक तरुण-तरुणींनी,क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत केले.यावेळी संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या क्रीडा स्पर्धेला भामरागड तालुक्यातील तसेच शेजारील गावातील अनेक नामांकित कबड्डी आणि व्हॉलीबॉल संघांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.उदघाटनीय स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.सद्या मिरगुळवंचा गावात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे.

या क्रीडा स्पर्धाच्या उदघाटनीय सोहळ्याला लक्ष्मीकांत बोगामी तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी भामरागड,​राजू वड्डे,राजू दुर्गे माजी ग्रामपंचायत सदस्य महागाव,प्रभाकर मडावी उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी,प्रसाद कुड्यामी,बिरजू तेलामी,​प्रवीण मोगरकर अध्यक्ष ओबीसी सेल काँग्रेस कमिटी,आकाश मोगरकर यांच्या सह काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते व जय धर्मकोला ताडो क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी,सदस्य,खेळाडू,आणि क्रीडाप्रेमींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकंदरीत खेळीमय वातावरणात व अत्यंत जल्लोषात क्रिडा महोत्सवाचे उदघाट्न सोहळा पार पडला.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close