Uncategorized

आलापल्ली येथे शुभविवाह सोहळा संपन्न; कंकडालवार दाम्पत्याने दिल्या नवदाम्पत्यास शुभेच्छा

आलापल्लीचे माजी सरपंच हुसेन मोहम्मद खान (अज्जू पठाण) यांची कन्या (मरियम) हिचा शुभविवाह (हबीब) यांच्याशी मोठ्या थाटामाटात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.

या मंगलमय शुभविवाह सोहळ्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार आणि अहेरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार दाम्पत्याने आवर्जून उपस्थिती दर्शविली.

यावेळी कंकडालवार दाम्पत्याने नवदाम्पत्य *मरियम आणि हबीब* यांची भेट घेऊन त्यांना सुखी,समृद्ध,आनंदी आणि मंगलमय वैवाहिक जीवनासाठी मनापासून हार्दिक शुभकामना व आशीर्वाद दिले.

अज्जू पठाण हे आलापल्ली परिसरातील परिचित आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले व्यक्तिमत्व असून,त्यांच्या कुटुंबातील या आनंद सोहळ्याला परिसरातील राजकीय,सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, नातेवाईक,मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनीच नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close