Uncategorized

आलापल्लीच्या श्रीकृष्ण मंदिरात डॉ.अजय कंकडालवार यांचे दर्शन; गडचिरोलीच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना

आलापल्ली : संपूर्ण देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना,अहेरी विधानसभा क्षेत्रातील आलापल्ली येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरातही भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

या पावन पर्वाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी आज आलापल्ली येथील श्रीकृष्ण मंदिराला भेट दिली.

मंदिरात पोहोचताच मंदिर समितीच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.डॉ.कंकडालवार यांनी मंदिरात विधिवत पूजा-अर्चना करून भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले आणि आरती केली.

विशेष म्हणजे श्रीकृष्ण जयंती निमित्त मंदिर समितीने भव्य गोपाळकाला कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला डॉ.अजयभाऊंनी भेट देऊन उपस्थित हजारो भाविकांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना ते म्हणाले,भगवान श्रीकृष्णाने महाभारतात अर्जुनाला दिलेला गीतेचा उपदेश हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून तो जीवन जगण्याची कला आहे.त्यांनी नेहमी सत्य आणि धर्माची बाजू घेतली.आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घ्यावी.

यावेळी डॉ.कंकडालवार यांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख, शांती, समाधान लाभो, जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी बांधव,कष्टकरी, कामगार सुखी राहो,जिल्ह्यातून दुःख, दारिद्र्य दूर होवो अशी मनोभावे प्रार्थना केली.

या प्रसंगी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मंदिर समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close