Uncategorized

ॲड.पंकज व ॲड.मृणाली यांचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न : संतोषभाऊ ताटीकोंडावार यांची उपस्थिती

अहेरी : ॲड. पंकज व ॲड.मृणाली यांचा विवाह सोहळा नुकताच नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला.या मंगल प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा जनकल्याण समाजोन्नती समितीचे जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी आवर्जून उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले.

विवाह सोहळ्यास शहरातील प्रतिष्ठित वकील मंडळी,सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच दोन्ही कुटुंबातील आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.पारंपरिक रितीरिवाज व मंगलाष्टकांच्या मंगलमय वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न झाला,वर-वधूला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थितांची मोठी गर्दी झाली होती.

यावेळी संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी नवदाम्पत्याचे अभिनंदन करताना म्हटले,तुझ्या आयुष्यातील या नव्या आणि सुंदर प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.तुमचा संसार प्रेम,विश्वास, आनंद,सुख-समृद्धी आणि अखंड सहवासाने फुलत राहो.प्रत्येक क्षण आनंदाचा, प्रत्येक दिवस यशाचा आणि प्रत्येक नाते अधिक दृढ होवो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले,तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा!तुमची जोडी सदैव सुखी, समृद्ध आणि आनंदी राहो.यावेळी त्यांनी ॲड. पंकज व ॲड. मृणाली यांना भेटवस्तू देऊन शुभाशीर्वाद दिले.

विवाह सोहळ्यानंतर आयोजित स्नेहभोजनाचा सर्व उपस्थितांनी आस्वाद घेतला.नवदाम्पत्याने सर्वांचे आभार मानले. एका आदर्श व सुशिक्षित जोडप्याचा हा विवाह सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close