Uncategorized

सुधागुडम येथील नागरिकांसोबत माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी साधला संवाद

अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे सुधागुडम येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी दौरा करून येथील गावकाऱ्यांसोबत संवाद साधत गावातील विविध समस्या त्यांनी जाणून घेतले.

त्यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पिण्याची पाण्याची समस्या,मुख्य पक्के रस्ते,नाली बांधकाम,असे अनेक प्रमुख समस्या असल्याचे नागरिकांनी सांगितले.

येथील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या कंकडालवार यांच्या समोर मांडण्यात आले असता गावातील सर्व समस्यांची निराकरण करण्याचे प्रयत्न करू,असे आश्वासन यावेळी कंकडालवार यांनी गावकऱ्यांना दिली.

यावेळी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close