माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी केले अपघातग्रस्त येलम परिवाराला मदतीचा हात

अहेरी : तालुक्यातील जिमलगाट्टा ( मेडपल्ली )येथील रहिवाशी सुधाकर लचमा येलम ( वय 54 वर्षे )हे काल टूव्हीलरने जात असतांना अपघात झाले होते.अपघातात सुधाकर येलम यांची जागीच मूत्यू झालं आहे.
नातेवाईकांनी पोस्ट मोडम करिता अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आली होती.मात्र येलम परिवार अंत्यत गरिबी असून त्याना पी.एम.करिता साहित्य खरेदी करण्यासाठी खूपच अडचण बसत होती.
सदर अडचणीची विषय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांना मिळताच पी.एम.करिता साहित्य खरेदी करून दिले.
मृतदेह पोस्टमॉर्टेमनंतर स्वगृही नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था न झाल्याने अडचण निर्माण झाली.परिस्थितीची गंभीरता ओळखून अजयभाऊंनी विलंब न करता तातडीने वाहन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
त्यांच्या तत्पर पुढाकारामुळे काही क्षणांतच वाहनाची व्यवस्था करण्यात आली आणि मृतदेह अहेरीहुन मूळगावी जिमगट्टा ( मेडपल्ली )येथे हलविण्यात आला.
स्थानिकांनी या संवेदनशील प्रसंगी दाखवलेल्या तत्पर मदतीबद्दल अजय कंकडालवार व त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत.



