Uncategorized

महागाव (खु) येथे स्व.व्यंकटेश कोडापे यांच्या तेरवी कार्यक्रमाला डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती,कुटुंबाचे केले सांत्वन

महागाव : अहेरी तालुक्यातील महागाव ( खु ) येथील रहिवासी स्व.व्यंकटेश अशोक कोडापे यांचे दि.04 मे 2026 रोजी दुःखद निधन झाले होते.त्यांचा तेरवीचा कार्यक्रम काल रविवारी, दि.24 मे 2026 रोजी त्यांच्या निवासस्थानी शोकाकुल वातावरणात पार पडला.

सदर तेरवी कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून स्व.व्यंकटेश कोडापे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.यावेळी त्यांनी कोडापे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना केली.

या प्रसंगी महागाव (खु) चे माजी सरपंच श्रीनिवास आलाम,माजी ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे,गणेश चौधरी,प्रवीण मडावी,चरण सिडाम,नागुलु आत्राम,प्रशांत कुमरे,सतीश सिडाम,निदेश सिडाम,प्रकाश दुर्गे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

स्व.व्यंकटेश कोडापे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते.त्यांच्या अकाली निधनाने महागाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.तेरवी कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.कोडापे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात संपूर्ण गाव सहभागी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close