Uncategorized

इंदाराम येथे काँग्रेस नेते कंकडालवार यांच्या घरगुती श्रीगणरायाची भव्य महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न

अहेरी : गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागातील अहेरी तालुक्यात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतात.यावर्षी सुद्धा ती परंपरा कायम ठेवत अहेरी तालुक्यात सगळीकडे बाप्पाचा प्रतिष्ठापणा मोठा उत्साहात पार पडला.

यात विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या मूळगाव असलेल्या इंदाराम येथे त्यांच्या निवासस्थानी दरवर्षी मोठ्या उत्साहात श्रीगणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत असतात.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा इंदाराम येथे माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली.आज इंदाराम येथे कंकडालवार परिवाराने श्रीगणरायांची विधिवत पूजा अर्चना व भव्य महाआरती करून भक्तगणं व समस्त नागरिकांसाठी आयोजित महाप्रसादाचे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

या महाप्रसाद कार्यक्रमाला तालुक्यातील शेकडो भाविक,भक्तजण उपस्थित राहून श्रीगणरायाची दर्शन घेऊन महाआरतीत सहभाग होऊन तदनंतर महाप्रसादाची आस्वाद घेतले.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close