माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तलांडे कुटुंबियांना आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील महागाव ( खुर्द ) येथील जेष्ठा रहिवाशी बारीकराव भीमा तलांडे यांची लखवानी आजार असून ही माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ यांनी महागाव खुर्द येथील यांच्या घरी जाऊन त्याबेत बाबत विचारपूस करून त्यांना अजयभाऊंनी आर्थिक मदत केली आहे.तुम्हाला समोर कोणत्याही समस्या असो मला सांगण्यात यावी म्हणून तलांडे कुटुंबाला सांगितले आहे.
यावेळी श्रीनिवास आलाम माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य महागाव खुर्द,गणेश चौदरी माजी सदस्य महागाव खुर्द,राजू दुर्गे ग्रामपंचायत महागाव भुजरुक, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक,बापू मडावी,सुभाष मडावी,ज्ञाणेश्वर तलांडे माजी उपासरपंच,सुमन तलांडे,प्रवीण मडावी,मनोज गावडे,विनोद गावडे,अनिल मडावी यांच्या सह स्थानिक कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.



