बाबलाई माता वार्षिक पुजा – पारंपरिक इलाका समिति ग्रामसभा यात्रा उत्सहात संपन्न
बाबलाई माता वार्षिक पुजा - सांस्कतिक संम्मेलानला काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांची उपस्थित

भामरागड : तालुक्यातील बेजुर या गावाला लागून असलेल्या बेजुर कोंगा पहाडीच्या पायथ्याशी बाबलाई मातेच्या मंदिर आहे.येथील दर वर्षी आदिवासी व गैर आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने यात्राचे आयोजान करत असतात.जल जंगल जमीन याच्या वर आधारित असणारे आदिवासी बांधव नवीन वर्षाच्या अतुरतेने वाट बघत असतात.
१ जानेवारी ते ३ जानेवारी पर्यंत बाबलाई माता वार्षिक पुजा व सांस्कृतिक संम्मेलनाचे आयोजन भामरागड पट्टी पारंपरिक गोटुल समितिच्या वतीने करण्यात येते.माता बाबलाई ही आदिवासी बांधवांचे प्रमुख देवता आहे.शेकडो वर्षांपासून परिसरातील लोक इथे पारंपरिकरित्या एकत्रा येत असतात.
क्षेत्रात जानेवारी महिन्यात धान कापणी संपलेली असते आणि नवीन धान खायला सुरुवात व्हायची असते.आदिवासी समुदाया मध्ये कोणत्याही नवीन वस्तु खाण्यापूर्वी किंवा कामाला सुरुवात करण्यापूर्वी पंडूम म्हणजे पुजा केली जाते.धान हा इथला महत्त्वाचा पीक आहे.म्हणून लोक नवीन धान खायला सुरुवात करण्यापूर्वी पिंडी पंडूम करतात.
या निमित्याने क्षेत्रातील आदिवासी व गैर आदिवासी एकत्र येतात व बाबलाई मातेच्या पुजा करतात.काल या बाबलाई माता वार्षिक पुजा – सांस्कतिक संम्मेलानात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित दर्शवून मातेच दर्शन घेऊन या पूजासाठी आर्थिक मदत केली आहे.
यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील समस्त आदिवासी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



