Uncategorized

सिरोंचा काँग्रेसचे धुरंधर मल्लिकार्जुन आकुला यांना तालुकाध्यक्ष करा : कार्यकर्ते व नागरिकांची जोरदार मागणी

सिरोंचा : तालुका काँग्रेस कमिटीतील एकनिष्ठ व सक्रिय नेते म्हणून ओळख असलेले मल्लिकार्जुन काका आकुला यांना तालुका अध्यक्षपदी नियुक्त करावे,अशी जोरदार मागणी कार्यकर्ते व नागरिकांमधून होत आहे.

काँग्रेससाठी सदैव तत्पर

मल्लिकार्जुन आकुला हे गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत.तालुक्यात काँग्रेस पक्षाला पहिल्या क्रमांकावर ठेवण्यासाठी ते कायम तत्पर असतात.पक्षवाढीसाठी गावोगावी फिरून त्यांनी संघटन मजबूत करण्याचे काम केले आहे.

अनुभवी नेतृत्व

मल्लिकार्जुन आकुला यांनी वडधाम ग्रामपंचायतीत दोन वेळा सरपंच आणि दोन वेळा उपसरपंच पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.तसेच पंचायत समिती मध्ये उपसभापती म्हणून काम केले,सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीवर दोनदा संचालक म्हणून काम करताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.सरपंच,उपसरपंच,उपसभापाती आणि संचालकपदाच्या अनुभवामुळे प्रशासकीय कामकाजाची त्यांना चांगली जाण आहे.

समस्यांवर ठाम,काम झाल्याशिवाय थांबत नाहीत

कार्यकर्त्यांच्या असो वा सर्वसामान्य नागरिकांच्या,कोणत्याही समस्येवर मल्लिकार्जुन काका ठामपणे उभे राहतात.प्रश्न सुटेपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत.प्रशासकीय कामांसाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून कामे मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा आहे.

आर्थिक मदतीसाठीही सदैव पुढे

नागरिकांच्या अडीअडचणीच्या काळात ते स्वतःहून आर्थिक मदत करतात. आजारपण, शिक्षण किंवा इतर कौटुंबिक प्रसंगात गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत.

सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व

सिरोंचा तालुक्यातील प्रत्येक गावात नागरिकांच्या लग्नकार्य, बारसे किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावतात.भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्याची त्यांची पद्धत सर्वांना आपलीशी वाटते.

तालुकाध्यक्षपदासाठी एकमुखी मागणी

उपसरपंच आणि बाजार समिती संचालकपदाचा प्रदीर्घ अनुभव, सामाजिक कार्याची तळमळ व पक्षनिष्ठा या सर्व जमेच्या बाजू पाहता, मल्लिकार्जुन आकुला यांनाच तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी निवडावे, अशी एकमुखी मागणी आता नागरिक व कार्यकर्ते करत आहेत. “काका अध्यक्ष झाले तर तालुक्यात काँग्रेस अधिक मजबूत होईल,” असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

पक्षश्रेष्ठी या मागणीची दखल घेऊन योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close