Uncategorized
गोपनार येथील आत्राम कुटुंबाचे नवस कार्यक्रमाला काँग्रेसनेते अजय कंकडालवार व हनमंतु मडावी यांची उपस्थिती

अहेरी : तालुक्यातील गोपनार येथील काँग्रेसचे कार्यकर्ते,अजयभाऊ कंकडालवार यांचे कट्टर समर्थक साईनाथ आत्राम यांच्या मुलीच्या नवस कार्यक्रम गोपनार येथे त्यांचे राहते घरी आयोजित केले आहे.या कार्यक्रमाची निमंत्रण आत्राम कुटुंबीयांनी दिल्याने त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत उपस्थिती दर्शवून भेट वस्तू देऊन शुभआशीर्वाद दिले.
यावेळी माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद आत्राम,नरेंद्र गर्गम,आशिफ पठाण,तशु शेख,प्रमोद गोडशेलवारसह आदी उपस्थित होते.