Uncategorized

कोडसेलगुडम येथील पेंदाम कुटुंबाच्या मदतीला धावले काँग्रेस नेते डॉ.अजय कंकडालवार; तेरवी व संसारासाठी केली आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील कोडसेलगुडम येथील रहिवासी विजय पेंदाम यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने पेंदाम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कुटुंब संकटात सापडले आहे.

पेंदाम कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.घरातील कर्ता पुरुष विजय पेंदाम यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबाचा आधारच हरपला.त्यामुळे होणाऱ्या तेरवीचा विधी कसा करायचा आणि पुढे घर कसे चालवायचे,हा गंभीर प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला होता.दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असताना तेरवीचा खर्च पेलणे कुटुंबाला शक्य नव्हते.

पेंदाम कुटुंबाच्या या बिकट परिस्थितीची माहिती स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मिळाली.त्यांनी तातडीने ही गंभीर बाब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांच्या कानावर घातली.कुटुंबाची दयनीय अवस्था व अडचणींची संपूर्ण माहिती कंकडालवार यांना देण्यात आली.

पेंदाम कुटुंबाची अडचण समजताच अजय कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला.त्यांनी होणाऱ्या तेरवीच्या विधीसाठी व पुढील काही दिवस घर चालवण्यासाठी पेंदाम कुटुंबाला आर्थिक मदत पाठवली.या मदतीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

ही मदत देताना येथील काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी संतोष सिडाम, नागेश मडावी, पोट्टी मडावी, सुरेश सिडाम, नामदेव सिडाम, प्रभाकर सिडाम, जया वेलादी, पोनाली सिडाम यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.पदाधिकाऱ्यांनी कंकडालवार यांच्यावतीने ही मदत पेंदाम कुटुंबियांकडे सुपूर्द केली.

यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “अजयभाऊ कंकडालवार हे नेहमीच गोरगरीब व गरजू लोकांच्या मदतीसाठी धावून जातात.संकटाच्या काळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना आधार देणे हेच त्यांचे ध्येय आहे.

कंकडालवार यांच्या या माणुसकीच्या कृतीमुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.पेंदाम कुटुंबियांनी देखील मदतीबद्दल कंकडालवार यांचे आभार मानले आहेत.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close