Uncategorized

दुर्गम भागातील मुलगी होणार डॉक्टर : गरीब विद्यार्थिनी श्रुती वड्डेला डॉ. अजय कंकडालवार यांची आर्थिक मदत

भामरागड : तालुक्यातील मलपोडूर येथील रहिवासी लालसू वड्डे यांची मुलगी कु.श्रुती लालसू वड्डे हिने NEET परीक्षेत चांगल्या गुणांनी यश मिळवून MBBS साठी प्रवेश मिळवला आहे.

दुर्गम आदिवासी भागातून एका मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होत असल्याने संपूर्ण गावासाठी आणि जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

श्रुतीचे MBBS ला प्रवेश निश्चित झाला असला तरी वड्डे परिवार अत्यंत गरीब आहे.पुढील शैक्षणिक खर्च,राहण्याचा खर्च आणि अभ्यासासाठी लागणारी साहित्ये यामुळे कुटुंबासमोर मोठी आर्थिक अडचण उभी राहिली होती.

आज लालसू वड्डे यांनी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी आपली आणि मुलीची आर्थिक परिस्थिती सांगितली.

कु.श्रुतीची आर्थिक अडचण जाणून घेताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी तातडीने श्रुतीच्या पुढील शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत केली.

यावेळी डॉ.कंकडालवार यांनी श्रुतीला शुभेच्छा देत सांगितले,तू जिल्ह्याचे नाव उज्वल कर.तुझा अभ्यास पूर्ण होईपर्यंत कोणतीही अडचण आल्यास मला थेट सांग. मी मदत करण्यासाठी नेहमी तयार आहे.

डॉ.कंकडालवार यांचे हे शब्द ऐकून लालसू वड्डे आणि संपूर्ण परिवार भावूक झाला.त्यांनी डॉ.कंकडालवार यांचे मनापासून आभार मानले.

गावासाठी अभिमानाची बाब

दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातून एक मुलगी डॉक्टर होत असल्याची बातमी संपूर्ण भामरागड तालुक्यात कौतुकाची ठरत आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close