Uncategorized

वनहक्क पट्ट्यासाठी शेतकऱ्यांचे अहेरीत निवेदन; अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला धावपळ

तिमराम येथील शेतकऱ्यांचे दावे सादर; तातडीने मोजणी करून कायम पट्टे देण्याची मागणी

अहेरी : तिमराम येथील शेतकऱ्यांना वनहक्क कायम पट्टे मिळावेत,यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय अहेरी यांना दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,मौजा तिमराम येथील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासून वनजमिनीवर शेती करीत असून,त्यांना वनहक्क कायद्यानुसार कायम पट्टे मिळणे आवश्यक आहे.यासाठी वनहक्क दावे तयार करून सादर करण्यात येत आहेत.तरी आपण आपल्या स्तरावरून तात्काळ मोजणी करून वनहक्क धारकांना कायम पट्टे देण्याची कृपा करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

या वेळी बोलताना डॉ. अजयभाऊ कंकडालवार म्हणाले, “गडचिरोली जिल्ह्यातील हजारो आदिवासी व पारंपारिक वन निवासी शेतकरी पिढ्यानपिढ्या जंगल जमिनीवर शेती करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.वनहक्क कायदा २००६ नुसार त्यांना कायमस्वरूपी पट्टा मिळणे हा त्यांचा हक्क आहे.मात्र अनेक शेतकरी आजही पट्ट्यापासून वंचित आहेत.प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व पात्र दावेदारांची तातडीने मोजणी,तपासणी व सुनावणी पूर्ण करून त्यांना पट्टे वितरित करावेत.

वनपट्टा मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ,पीक कर्ज,पीक विमा व इतर सुविधा मिळत नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.तसेच वनपट्ट्याअभावी शेतकरी आपली जमीन विकसित करू शकत नाहीत, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

यावेळी तिमराम व उमनूर परिसरातील शेतकरी,ग्रामस्थ, वनहक्क समितीचे सदस्य तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या मागणीवर प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही करावी,अन्यथा पुढील आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या निवेदनामुळे तिमराम परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून,प्रशासनाकडून लवकरच मोजणीची प्रक्रिया सुरू होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close