Uncategorized

अहेरी इंदाराम,व्येकटापूर व आवलमरी या रस्त्याचे बांधकाम व दुरुस्ती तात्काळ करा

अन्यथा खड्डयामध्ये धान रोवणी करत चक्काजाम आंदोलनाची कंकडालवार यांच्या इशारा

अहेरी : इंदाराम व व्येकंटापूर,आवलमरी या रस्त्यावर मोठंमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून मार्गक्रमण करतांना या गावांमधील नागरिकांना पावसाळ्यात नाहक त्रासाला सामोरे जावं लागतं आहे.

या रस्त्याची बांधकाम व दुरुस्ती विषयी अनेकदा पत्र व्यवहार केल्यानंतर सुद्धा संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे आरोप करित येत्या सात दिवसाचे आत रस्त्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात न झाल्यास या रस्त्यावरील खड्ड्यामध्ये धान रोवणी करत चक्काजाम आंदोलन करण्याची इशारा काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली आहे.

काँग्रेस नेते कंकडालवार यांनी कार्यकारी अधिकारी,बांधकाम विभाग आलापल्ली यांना दिलेल्या पत्रात वरील रस्त्याची चाळणी झालेली असून तात्काळ दुरुस्ती करने आवश्यक आहे. या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिकांसह विध्यार्थ्यांना सुद्धा जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे.अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. म्हणून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती कामाला सुरुवात न केल्यास धान रोवणीसह चक्काजाम आंदोलनाची इशारा काँग्रेस नेते कंकडालवार यांनी दिली आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close