Uncategorized

येनापूर ( किष्टापूर टोला) येथे पंचशील बुद्धविहाराचे लोकार्पण : जनतेत अहिंसेचा संदेश रुजवा – अजय कंकडालवार

मा.श्री.आमदार विजयभाऊ वाडेट्टीवार यांचा हस्ते लोकार्पण

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील किष्टापूर टोला (येनापूर) येथे पंचशील बौद्ध समाज मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्मित पंचशील बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा व तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी कॅबिनेट मंत्री,ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते मा.श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बुद्धविहाराच्या परिसरात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण व सामूहिक त्रिशरण-पंचशील ग्रहण करण्यात आले. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी तथागत बुद्धांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

आपल्या उद्घाटनपर भाषणात वडेट्टीवार म्हणाले,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्ध धम्माचा मार्ग हा समता,स्वातंत्र्य,बंधुता व न्यायाचा मार्ग आहे.या बुद्धविहाराच्या माध्यमातून गावात प्रबोधनाचे कार्य अविरत सुरू राहील.

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार उपस्थित होते.त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला वंदन करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी उपस्थित अनुयायांशी संवाद साधताना अजयभाऊ कंकडालवार म्हणाले,तथागतांनी संपूर्ण जगाला शांती व अहिंसेचा संदेश दिला.आज देशात द्वेषाचे वातावरण निर्माण होत असताना बुद्धांचा ‘करुणा,मैत्री व अहिंसा हा संदेश प्रत्येक घराघरात पोहोचवणे ही काळाची गरज आहे.हा बुद्धविहार केवळ प्रार्थनास्थळ नसून विचारांचे केंद्र व्हावे.त्यांनी उपस्थित युवकांना व्यसनमुक्ती व शिक्षणाची कास धरण्याचे आवाहनही केले.

पंचशील बौद्ध समाज मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सदस्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.गावातील महिला भगिनींनी स्वागतगीत व बुद्धवंदना सादर केली.बुद्धविहाराच्या बांधकामासाठी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून व श्रमदानातून मोठे योगदान दिले.

कार्यक्रमाला काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष ऍड.विश्वजीत कोवासे,ऍड.राम मेश्राम, बंडूभाऊ शनिवारे सह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता सामूहिक भीमगीत व स्नेहभोजनाने झाली.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close