खेळाच्या माध्यमातून क्रीडा कला गुणांना व्हावं मिळेल माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन
एटापल्ली : तालुक्यातील हेटलकसा येथील जय सेवा युवा क्रीडा मंडळ हेटलकसा तर्फे भव्य ग्रामीण कब्बड्डी स्पर्धेचे आयोजित केले आहे.या कब्बड्डी सामन्याचे उदघाटन काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांचे हस्ते करण्यात आली.सर्व प्रथम वीर बाबुराव शेडमाके,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,बिरसा मुंडा प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
सदर कब्बड्डी स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात आली.तसेच आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांच्या कडून दुसरा पारितोषिक देण्यात आली.यावेळी मंचावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसनेते नंदूभाऊ मट्टमी हे होते.तसेच त्यावेळी मंडळाकडून अजय कंकडालवार आणि हणमंतु मडावी यांचे स्वागत करण्यात आली.
त्यावेळी खेळाळूना मार्गदर्शन करताना अजयभाऊ कंकडालवार यांनी बोलले की,कोणतेही खेळ हे शारीरिक सुदृढ व आरोग्यासाठी युवकांनी खेळ खेळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.ग्रामीण भागातील युवक खेळाच्या माध्यमातून आपले व आपल्या जिल्ह्याचे नावलौकिक करावे तसेच आपल्यातील क्रीडा व कला गुणांना व्हावं मिळते असे उदघाटन प्रसंगी उदघाटक स्थानावरून प्रतिपादन केले.सदर स्पर्धेत परिसरातील अनेक संघाने सहभाग घेतले आहेत.
यावेळी केशरी पाठील तेलामी सरपंच देवदा,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,अज्जू पठाण माजी सरपंच आलापल्ली,प्रमोद गोडसेलवार,गणेश हलामी ग्रामपंचायत बोलेपल्ली,मराठे साहेब,वनिता तिम्मा ग्रामपंचायत सदस्य,नरेश काटो ग्रामपंचायत सरपंच वेगणुर,संतोष तुमरेटी ग्राप.देवदा उपसरपंच,केशव कुडयेटी ग्रा.प. चांदणवेली,रामदास नारोठे ग्रा.प सदस्य देवादा,लालसु नरोटे पाटील,शिणू हालामी गाव भुमिया,कमळताई हालामी, पल्लवी हलमी,बालाजी, लेखमी, मनोहर हालामि ,नरेश हालामी,चेतना हलामी,सुरेखा लेखामी,गणेश नारोठे, निकेश लेखामि,महेंद्र हलामीसह परिसरातील खेळाळू प्रेमी तसेच गावातील समस्त नागरिक,स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.