Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी करून दिली मृतदेह स्व:गावी नेण्यासाठी खाजगी वाहनाची व्यवस्था

नगरसेवक प्रशांत गोडसेलवार सह स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून केले मृतकाचे कुटुंबाला सहकार्य

अहेरी : तालुक्यातील छल्लेवाडा येथील जेष्ठा रहिवाशी कमलाबाई लच्चीराम चव्हाण ( वय 65 वर्षे ) हिला बीपी वाढल्याने तसेच प्रकृती खूप बिघडल्याने त्यांचे नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.

परंतु उपचारादरम्यान त्यांची डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले होते.मृतक चव्हाण यांचे कुटुंब अंत्यत गरीब असल्याने त्यांना मृतकाचे मृतदेह  स्व:गावी घेऊन जाण्यासाठी  आर्थिक अडचण भासत होती.सदर माहिती येथील काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना देताच त्यांनी तात्काळ मृतकाचे मृतदेह स्व:गावी छल्लेवाडा येथे नेण्यासाठी कंकडालवारांनी खाजगी चार चाकी वाहन उपलब्ध करून दिले.

यावेळी चव्हाण कुटुंबातील सर्व सदस्यांनी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार मानले.यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार तसेच काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित राहून मृतकाचे कुटुंबाला सहकार्य केले.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close