Uncategorized
इंदाराम येथील बतकम्मा मंडळाला माजी पंचायत समिती उपसभापती सोनाली कंकडालवार यांनी दिली भेट

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही इंदाराम वार्ड नंबर दोन येथे बतक्काम उत्सव उत्सहात पार पडला.सद्दुला बतकम्मा मंडळाला काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी सद्दुला बतकम्मा मंडळाला भेट देत बतकम्माचे पूजन केले.ह्यावेळी मंडळाने सोनालीताई यांचे स्वागत केले.ह्यावेळी नवरात्र व बतकम्मा दसरा उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच ह्या पुढेही मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
यावेळी वर्षाताई पेंदाम सरपंच इंदाराम,स्मिता कंकडालवार,कोत्तावडलावार ताई, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,श्रीनिवास कोत्तावडलावार,निलेश पलकृत्तीवर,रोशन समलावर लक्ष्मण आत्राम आदी उपस्थित होते.



