Uncategorized

सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयाची श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ रूपांतर करा

सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम यांनी केली प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

सिरोंचा तालुक्याची वाढती लोकसंख्या,येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची ताण,आणि येथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन येथील ग्रामीण रुग्णालयाची उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ रूपांतर करण्याची मागणी सिरोंचाचे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम यांनी तहसीलदारांमार्फत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकिस्तक यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

आज सिरोंचाचे नायब तहसीलदार नरेंद्र एस.हलामी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना पाठविलेल्या निवेदनात जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना विनंती करत, ग्रामीण रुग्णालयाची उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून सकारात्मक अहवाल राज्य सरकार आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करून आवश्यक पाठपुरावा करण्याची कृपा करालं,जेणेकरून सिरोंचा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला चांगली व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याची मार्ग सुकर होणार असल्याची म्हंटले आहे.

प्रशासनाला पाठविलेल्या निवेदनात पुढे म्हंटले आहे कि,सिरोंचा तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणारे बाह्यरुग्णांची संख्येमध्ये सुद्धा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसून येत आहे.

मात्र येथील रुग्णांना बालरोगतज्ञ,स्त्रीरोगतज्ञ,सर्जन आणि भूलतज्ञ यांसारख्या विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळणारी आरोग्य सुविधा रुग्णांना त्या आजारावरील रुग्णांवर वेळेवर मिळत नाही आहे.त्यामुळे येथील रुग्णसेवा अत्यंत प्रभावित होत आहे.परिणामी येथील रुग्णांना वेळेवर आवश्यक उपचारासाठी शेजारच्या तेलंगणात धाव घ्यावं लागत आहे.म्हणून येथील रुग्णांची नेहमीची ही हाल थांबविण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयाची तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करणे अत्यंत आवश्यकता आहे.

रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची आरोग्य सेवा जपण्याची जबाबदारी ही संबंधित आरोग्य विभाग आणि राज्यसरकारची आहेत.सर्वसामान्य जनतेला उत्कृष्ट वैद्यकीय उपचार,नामांकित कंपन्याचे दर्जेदार औषधे आणि अनुषंगिक सेवांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकार आणि संबंधित विभागाची कर्तव्यासह जबाबदारी सुद्धा आहेत.बहुतेक याची विसर काहीं वर्षांपासून राज्यसरकार व संबंधित विभागाला पडल्याचे दिसून येत आहे.

येथील ग्रामीण रुग्णालयात मागील काही वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक पदासह एम.बी.बी.इस डॉक्टर व सहाय्यक अधीक्षक आणि अन्य काही महत्वपूर्ण पदे रिक्त असल्यामुळे येथील बाह्यरुग्ण व दाखल रुग्णांवर याचे विपरीत परिणाम होत आहे.येथील रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेचा दर्जाही खालवत आहे.तज्ञ डॉक्टरांअभावी येथील गोरगरीब रुग्णांना वर्षानुवर्षांपासून तेलंगणातील खाजगी रुग्णालयांचा खर्च सहन करावं लागत आहे.म्हणून येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदेही तात्काळ भरण्यात यावी.तसेच येथील ग्रामीण रुग्णालयाची उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरुवात न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याची इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे.

सिरोंचाचे नायब तहसीलदार नरेंद्र एस.हलामी यांच्याकडे निवेदन सादर करतांना सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम समवेत किरणकुमार वेमूला,वसंत डुरके, संपत गोगुला आदि पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close