Uncategorized

तलावाच्या मातीमुळे रस्ता झाला चिखलमय : कंकडालवार यांनी केली पाहणी,संबंधितांना दिल्या सूचना

अहेरी : ग्रामपंचायत इंदाराम येथे जिल्हा परिषद ( सिंचन विभाग )अंतर्गत तलावाचे खोलीकरणाचे काम करण्यात आले होते.तलावाच्या खोलीकरण करताना त्यातून निघालेली माती तलावाच्या पारीवर टाकण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढल्याने तलावाच्या पारीवर टाकलेली माती चिखलात रूपांतरित झाली.त्यामुळे कोकपारला जाणारा मुख्य रस्ता पूर्णतः चिखलमय झाला आहे.

रस्ता चिखलमय झाल्याने शाळकरी मुले,शेतकरी आणि रोजंदारीवर जाणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.दुचाकी आणि चारचाकी वाहनेही वारंवार या रस्त्यात अडकत होती?

येथील ग्रामस्थांनी ही समस्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कानावर टाकताच त्यांनी वेळेचा विलंब न करता धाव घेत रस्त्याची पाहणी केली .

पाहणीनंतर डॉ.कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेचे सिंचन विभाग आणि संबंधित ग्रामसेवक,सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन चिखलमय झालेल्या रस्त्या सुरळीत करण्याची सूचना दिली.

पावसाळ्यात नागरिकांना मूलभूत सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.तलावाचे काम झाले म्हणून रस्ता बंद पडता कामा नये.तातडीने माती बाजूला करून रस्ता दुरुस्त करा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

डॉ.कंकडालवार यांच्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.दिलेल्या वेळेत रस्ता स्वच्छ न झाल्यास पुन्हा पाठपुरावा करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close