माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन
अहेरी : तालुक्यातील वेलगूर येथील न्यू स्टार मंडळ वेलगूर तर्फे भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या व्हाॅलीबाॅल सामन्याचे उदघाटन काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.
भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून पाहिलं पारितोषिक देण्यात येत आहे.तसेच दुसरा पारितोषिक काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती गीताताई चालूरकर,आनंदरावजी मराते कडून तर तिसरा पारितोषिक गोमणी ग्रामपंचायतचे उपसरपंच शुभम शेंडे स्व.श्री.विलास गदेकर यांचे स्मृती प्रित्यर्थ देण्यात आली.त्यावेळी अजय कंकडालवार यांचे मंडळ कडून तसेच गावातील नागरिकांकडून सत्कार व स्वागत करण्यात आली.