आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचा वाढदिवस निमित्त अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटप
अहेरी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते,महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षानेते व ब्रम्हपुरी मतदारसंघचे आमदार,माजी कॅबिनेट मंत्री मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा वाढदिवस निमित्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध कार्यक्रम घेण्यात आली आहे.
आविसं,काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांच्या प्रमुख उपस्थित ना.विजय वडेट्टीवार यांचा वाढदिवस निमित्त अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ,बिस्कीट वाटप करण्यात आली आहे.दरम्यान किस्टापुर परिसरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाही घेतली.तसेच क्षेत्रातील गरीब कुटुंबियांना आर्थिक मदत सुद्धा करण्यात आली आहे.
यावेळी अजय नैताम माजी जि.प.सदस्य,रोजा करपेत नगरपंचायत नगरअधक्ष अहेरी,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,सुनीता कुसनाके माजी जि.प.सदस्य,मधुकर वेलादी माजी सरपंच,स्वप्निल मडावी,दिलीप मडावी सरपंच वांगेपली,सुधाकर तीम्मा,नरेश गर्गम,दिनेश दहाके,दिनेश मडावी,कुमारभाऊ,अरपाज भाऊ,प्रकाश दुर्गे,सचिन पांचार्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.