काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी दिले,ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांना शुभेच्छा
अहेरी : काँग्रेसनेते,महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते व ब्रम्हपुरी मतदारसंघचे लोकप्रिय आमदार,माजी कॅबिनेट मंत्री : मा.ना.श्री.विजयभाऊ ( विज्जूभाऊ ) वडेट्टीवार यांच्या आज वाढदिवस निमित्त राज्यभर जलोषत साजरा करण्यात येत आहे.काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.
आज ना.विजय वडेट्टीवार यांच्या नागपूर निवास्थानी येथे आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी वडेट्टीवार साहेबांची भेट घेऊन शुभेच्छा दिले.तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सद्या असलेल्या राजकीय परिस्थिती बाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.