माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या वाढदिवस निमित्त राजाराम येथील वृक्षारोपण तसेच विध्यार्थ्यांना पेन बुक वाटप
अहेरी : तालुक्यातील राजाराम येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार यांच्या वाढदिवस निमित्त गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी वृक्षारोपण,विध्यार्थ्यांना पेन बुक वाटप,गोरगरीब जनतेला अन्नधान्य वाटप तसेच काही जनतेला मदतीचा हात पण देण्यात आली आहे.
आज त्या निमित्त राजाराम परिसरातील प्रत्येक गाव गावात वृक्षारोपण करण्यात आली आहे.तसेच राजाराम प्राथमिक जि.प.शाळेत विध्यार्थी विद्यार्थींना पेन,बुक वाटप करण्यात आली आहे.त्यावेळी विद्यार्थींन चेहऱ्यावर आनंदाचा वातावरण दिसून आले आहे.त्यावेळी शाळेतील विध्यार्थ्यांनी अजयभाऊ कंकडालवार यांना वाढदिवस शुभेच्छा दिले आहे.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कंबगौनीवार,ग्रामपंचायत सदस्य संजावनी अरगेला,ग्रामपंचायत सदस्य पूजा सडमेक,ग्रामपंचायत सदस्य यशोदा आत्राम,अध्यक्ष अरविंद परकिवार,पेसा अध्यक्ष विनोद सिडाम,केंद्र प्रमुख सुनील आईंचवार,मुख्याध्यापक अजय पस्पनुवार,शिक्षक विनोद पसालवार,चुधरी सर,मडावीसरसह राजाराम परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.