जननेता म्हणून उत्तम उदाहरण म्हणजे अजय कंकडालवार : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील गरिबांचे आराध्य दैवत

गडचिरोली : नेता कसा असावा?या प्रश्नाचे उत्तर गडचिरोली जिल्ह्यात एकाच नावाने दिले जाते ते म्हणजे अजय कंकडालवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार हे आज जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील गरिबांचे आराध्य दैवत बनले आहेत.
संकटात धावून जाणारा नेता
अहेरी असो,भामरागड असो की सिरोंचा जिल्ह्यातील कुठेही नैसर्गिक आपत्ती आली,अपघात झाला किंवा कुणाच्या घरात दुःखाचा डोंगर कोसळला,तर सर्वात आधी पोहोचणारे नाव म्हणजे डॉ.अजय कंकडालवार अलीकडेच तलवाडा येथील अपघातात मृतांच्या कुटुंबाला पोस्टमॉर्टमचे साहित्य व मृतदेह नेण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले.कोडसेलगुडम येथील विजय पेंदाम यांच्या निधनानंतर पेंदाम कुटुंबाच्या तेरवीसाठी व घर चालवण्यासाठी आर्थिक मदत केली.
हक्कासाठी लढणारा आवाज
जिल्ह्यातील शेतकरी,आदिवासी, मजूर यांच्या प्रश्नांसाठी कंकडालवार नेहमीच रस्त्यावर उतरले आहेत.धानाला भाव मिळवून देण्यापासून ते बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादकांना भरपाई मिळवून देण्यापर्यंत प्रत्येक लढ्यात ते शेतकऱ्यांच्या सोबत उभे राहिले.हवामान खात्याचा इशारा येताच शेतकऱ्यांना 14 मे पूर्वी धान कापणी उरकण्याचे आवाहन करून त्यांनी पुन्हा आपली संवेदनशीलता दाखवली.
विकासकामांचा धडाका
जि.प.अध्यक्ष असताना त्यांनी जिल्ह्यातील दुर्गम भागात रस्ते,पूल, शाळा,अंगणवाड्या,पाणीपुरवठा योजना यांसारखी शेकडो विकासकामे मार्गी लावली.आजही कोणतेही पद नसताना केवळ जनसंपर्काच्या जोरावर ते शासन दरबारी पाठपुरावा करून जनतेची कामे करून घेतात.
जात-पात, पक्ष-विरहित काम
कंकडालवार यांचे वैशिष्ट्य म्हणजे मदत करताना ते कधीही जात,धर्म किंवा पक्ष पाहत नाहीत.मदत मागणारा प्रत्येकजण माझा माणूस आहे, ही त्यांची भूमिका आहे.त्यामुळेच भाजप,राष्ट्रवादीसह इतर पक्षांचे कार्यकर्तेही अडचणीच्या वेळी त्यांनाच फोन करतात.
24 तास उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी
रात्री 2 वाजता फोन केला तरी “बोला” म्हणून उत्तर देणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे.मोबाईल कधीच बंद नसतो.प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.
जनतेच्या मनातील नेता
एखाद्या वृद्धेचे पेन्शन बंद झाले, प्रत्येक गावातील माता मंदिर,हनुमान मंदिर,कुणाच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे नाहीत,कुणाचे ऑपरेशन करायचे आहे.अशी शेकडो कामे कंकडालवार यांनी स्वखर्चाने केली आहेत.त्याची कधीच जाहिरात केली नाही.लोकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच माझी खरी पोचपावती आहे,असे ते नेहमी सांगतात.
आजच्या राजकारणात जिथे प्रसिद्धीसाठी कामे केली जातात, तिथे अजय कंकडालवार हे ‘काम झाल्यावर सांगा’ या वृत्तीने काम करणारे दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यातील जनता त्यांना ‘जननेता’ नाही तर ‘आराध्य दैवत’ मानते.



