गोविंदा आला रे!आलापल्लीत दहीहंडीचा जल्लोष ; कंकडालवार दाम्पत्याची उपस्थिती

आलापल्ली : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून आलापल्ली येथील वीर बाबुराव चौकात फ्रेंड्स क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
या उत्सवाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार या दाम्पत्याने विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
वीर बाबुराव चौक परिसरात यानिमित्त आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती.ढोल-ताशांच्या गजरात, ‘गोविंदा आला रे आला’ च्या जयघोषात संपूर्ण आलापल्ली नगरी दुमदुमून गेली होती. परिसरातील विविध गोविंदा पथकांनी थरावर थर रचून दहीहंडी फोडण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न केले.यावेळी नागरिकांनी एकच जल्लोष केला.
यावेळी कंकडालवार दाम्पत्याने सर्व गोविंदा पथकांचे मनापासून कौतुक केले.तसेच उपस्थित नागरिक,युवक,महिला व आयोजक मंडळाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
तसेच यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी डॉ.अजय कंकडालवार व हनुमंतू मडावी यांच्या वतीने भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.हजारो भाविकांनी व नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक म्हणून डॉ.अजय कंकडालवार यांच्याकडून 55,555/- रुपयांची रोख रक्कम देण्यात आली.
दरवर्षी या ठिकाणी डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून अशाच प्रकारे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते,अशी माहिती आयोजकांनी दिली.
या कार्यक्रमाला फ्रेंड्स क्रीडा मंडळाचे पदाधिकारी,गोविंदा पथक,काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक,भाविक उपस्थित होते.



