खा.डॉ.नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध कार्यक्रम
अहेरी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठनेते व गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेबांचा वाढदिवस निमित्त काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार व सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी साहेबांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पाडले.
दरम्यान अहेरी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या प्रमुख उपस्थित अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप,नागेपल्ली सेवासदन दवाखान्यात रुग्णांना फळ,बिस्केट वाटप तसेच अहेरी शाळेतील विध्यार्थी – विध्यार्थींना पेन बुक चॉकलेट,कंकडालवार,मडावी यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील गोरगरीब जनतेला साडी वाटप तसेच काही जनतेला आर्थिक मदत सुद्धा करण्यात आले.
यावेळी रज्जाक खान पठाण,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,स्वप्नील मडावी,चंद्रशेखर बेज्जलवार,बग्यश्रीताई बेज्जलवार ग्रामपंचायत सदस्य आलापल्ली,हनिप शेख,मधुकर सडमेक अहेरी विधानसभा एस.टी.सेल,सतीश कोरेत,जगताप कोरेत,किशोर सडमेक माजी पेसा अध्यक्ष,जावेद शेख,सतीश मडावी,विनोद मडावी,कोशोर सडमेक,जगपती सडमेक,संतोष येनगंटीवार,सचिन पंचार्य,नरेंद्र गर्गम,कार्तिक तोगम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गेसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते