Uncategorized

कॅन्सरग्रस्त महिलेला कंकडालवार यांची आर्थिक मदत : नागपूर येथील उपचारासाठी दिला हातभार

अहेरी : तालुक्यातील काटेपल्ली येथील रहिवासी तुळजाबाई तुळशीराम मडावी या गेल्या काही वर्षांपासून कॅन्सर आजाराने पीडित आहेत.त्यांच्यावर नागपूर येथील NCI रुग्णालयात किमोथेरपीचे उपचार सुरू आहेत.

उद्या त्यांचा चौथा किमो असल्याने नागपूरला जाणे आवश्यक होते.मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली होती.

ही माहिती देवलमारी ग्रामपंचायतीचे सदस्य लक्ष्मण आत्राम यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांना दिली.रुग्णाची परिस्थिती समजताच डॉ.कंकडालवार यांनी तातडीने रुग्णास अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले.आज तुळजाबाई मडावी यांना कार्यालयात आणल्यानंतर डॉ.अजय कंकडालवार यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी डॉ.कंकडालवार यांनी नागपूरला जाण्या-येण्यासाठी आणि उपचाराच्या स्वखर्चासाठी तातडीची आर्थिक मदत केली.

त्यांनी तुळजाबाई यांना धीर देत सांगितले, उपचारादरम्यान आणखी कोणत्याही मदतीची गरज भासल्यास अजिबात विचार करू नका.थेट मला मोबाईलवर कॉल करा.मी मदतीसाठी नेहमी तयार आहे.डॉ.कंकडालवार यांच्या या मदतीमुळे मडावी कुटुंबीयांनी मनापासून आभार मानले.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close