अहेरीत जिल्हाधिकाऱ्यांची काँग्रेस नेते अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांनी घेतली भेट
भेटीत काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले विविध ज्वलंत समस्या

अहेरी : येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकतीच भेट दिली.या भेटीत काँग्रेस नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेस पक्षाचे आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष हणमंतु मडावी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर अहेरी विधानसभा क्षेत्रातल्या विविध ज्वलंत मांडत विकासकामांवर सुद्धा सविस्तर चर्चा केली.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांच्या आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी पंडा यांनी नुकताच अहेरी दौऱ्यावर आले होते.त्यांच्या या दौऱ्यात काँग्रेस नेते कंकडालवार आणि मडावी यांनी पायाभूत सुविधा,रोजगार,रस्ते,पाणीपुरवठा,आरोग्य व शिक्षण आदि प्रलंबित समस्यांवर सविस्तर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची त्यांच्याकडे मागणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी पंडा यांनी काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याकडे उपस्थित केलेल्या समस्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे विधानसभा क्षेत्रातल्या स्थानिक विकासाला नवे बळ मिळेल आणि प्रलंबित समस्या मार्गी लागेल अशी अपेक्षा सगळीकडून व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार व हणमंतू मडावी यांचे समवेत आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,सुरेखा आलम माजी सभापती पंचायत समिती अहेरी,नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार अहेरी,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा कंकडालवारांचे स्वीय सहाय्यक कार्तिक तोगम,स्वप्नील मडावी,नरेश गर्गम्,प्रमोद गोडसेलवार प्रवीण कोरेत,पिंटू मडावी आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



