राजाराम येथे जि.प.शाळेत नवीन वर्ग खोलीचे उदघाटन संपन्न
"शब्द दिले पूर्ण केले" माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या शुभहस्ते उदघाटन
अहेरी : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय राजाराम येते जिल्हा परिषद केंद्र शाळा असून इयत्ता १ ते ७ वी पर्यंत शिक्षण असून २०० च्या जवळपास विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र गेल्या अनेक वर्षापासून वर्ग खोलीच्या कमतरता असून याकडे दुर्लक्ष केल्या जात होती.मात्र राजाराम येते केन्द्र स्तरीय बाल क्रिडा सम्मेलन आयोजीत करण्यात आले होते त्याअनुषंगाने माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार आले होते.तेव्हा माजी सभापती भास्कर तलांडे यांनी नवीन वर्ग खोलीची मागणी केली त्याक्षणी जि.प.माजी अध्यक्ष यांनी शब्द दिली कि मि जिल्हा परिषदेच्या कोणत्याही निधीतून शाळेच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करू देऊ त्यानुसार.जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आली होती,मात्र स्थानिक राजकारणामुळे सदर वर्ग खोली झाली नव्हती व निधी परत करण्यात आले.पण पुन्हा सदर नवीन वर्ग खोली आवश्यक असल्याचं माजी सभापती यांनी विषय रेटून धरले त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांनी एक नवीन वर्ग खोलीसाठी निधी देवून मंजूर केले होते.सदर वर्ग खोलीचे बांधकाम पूर्ण झाले असून आज पासून शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.असून आज आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली असून सदर कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,जि.प.सदस्य अजय नैताम,शाळा व्यवस्थापण समितीचे उपाध्यक्ष सौ.मीना सड़मेक,राजाराम ग्रामपंचायत,माजी सरपंचा सौ.जोतीताई जुमानके,माजी उपसरपंच संजय पोरतेट,महेश्वरी बत्तूलवार,सुरेश सोयाम,रमेश पोरतेट,अरविंद परकिवार,दिपक अर्का,नारायण चालुरकर,सतीश निष्टूरी,आदि उपस्थित होते.यावेळी केंद्र प्रमुख पुसालवार सर,मुख्याध्यापक पस्पूनवार सर,ग्रामसेवक झाडे साहेब,शिक्षक जुमानके सर मडावी सर,चुदरी सर,आत्राम सर,व विध्यार्थी उपस्थित होते.